Home » Uncategorized » तीन वर्षांनंतर कार्तिकस्वामी दर्शनाची पर्वणी; राजपुरीकडे अवजड वाहनांना बंदी, पाचगणी पोलिसांचे नियोजन!

तीन वर्षांनंतर कार्तिकस्वामी दर्शनाची पर्वणी; राजपुरीकडे अवजड वाहनांना बंदी, पाचगणी पोलिसांचे नियोजन!

Facebook
X
WhatsApp

लहू चव्हाण, पाचगणी.

तीन वर्षांनंतर कार्तिकस्वामी दर्शनाची पर्वणी; राजपुरीकडे अवजड वाहनांना बंदी, पाचगणी पोलिसांचे नियोजन!

पाचगणी,  : मौजे राजपुरी येथील श्री कार्तिकस्वामी मंदिरात मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत विशेष दर्शनाचा योग असून, या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या विशेष योगाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पाचगणी पोलीस ठाण्याने वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.
या दिवशी महिलांनाही श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाचगणी पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार, सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत पाचगणी येथून खिंगरमार्गे राजपुरीकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच खिंगर, आंब्रळ व राजपुरी येथील ग्रामस्थांनी आपली चारचाकी व अन्य वाहने सार्वजनिक रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी उभी करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने आढळल्यास संबंधित वाहनधारकांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
भाविकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व ग्रामस्थ, वाहनधारक व भाविकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News