Home » Uncategorized » फुटबॉलच्या मैदानात विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा डंका

फुटबॉलच्या मैदानात विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा डंका

Facebook
X
WhatsApp

लहू चव्हाण, पाचगणी.

फुटबॉलच्या मैदानात विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा डंका; चार खेळाडूंच्या दमदार कामगिरीने हिंदुस्तान एफ.सी. विजेता !

पंचगणी (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल चॅम्पियनशिप २०२६–२७ स्पर्धेत हिंदुस्तान एफ.सी. संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयी संघात विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सीबीएसई (CBSE), पंचगणीच्या चार विद्यार्थ्यांनी प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
विद्यानिकेतनचे चार शिलेदार चमकले!
या स्पर्धेत हिंदुस्तान एफ.सी. संघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यानिकेतनचे खेळाडू पुढीलप्रमाणे :
रुद्र बारगुडे – इयत्ता सातवी
हर्षराज जगताप – इयत्ता सातवी
रुद्र ढेबे – इयत्ता सातवी
जनक मेहता – इयत्ता आठवी
या चारही खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि दमदार खेळ करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. उत्कृष्ट सांघिक समन्वय, मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
उपांत्य फेरीत २–० ने विजय; अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटचा थरार!
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हिंदुस्तान एफ.सी. संघाने कराड शिवाजी एफ.सी. संघाचा २–० असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सातारा येथील Yash FC संघाविरुद्ध चुरशीची लढत रंगली. अटीतटीच्या या सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये हिंदुस्तान एफ.सी.ने ५–४ असा रोमांचक विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजेत्या संघाचा पारितोषिक वितरण समारंभ सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख श्री. अमृत गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.

 

प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले महत्त्वाचे

 

या संपूर्ण स्पर्धेत संघाचे प्रशिक्षक श्री. मोनिल शिंदे यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सराव, शिस्त आणि सांघिक खेळावर भर देत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रशिक्षकांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनासह खेळाडूंच्या मेहनतीमुळे हिंदुस्तान एफ.सी. संघाला विजेतेपद मिळवण्यात यश आले.

 

विद्यानिकेतन परिवाराकडून खेळाडूंचे अभिनंदन

 

विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सीबीएसई, पंचगणीच्या व्यवस्थापनाने या चारही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेच्या डायरेक्टर श्रीमती भारती बिरामणे, मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे, प्राचार्य श्री. मनोज पिल्ले, ऑफिस कोऑर्डिनेटर श्री. राजन गाडेकर, ॲडमिन मेंबर श्री. सुशांत सर तसेच संपूर्ण विद्यानिकेतन परिवाराने खेळाडू आणि प्रशिक्षकांचे कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यानिकेतनचे विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेतील या यशामुळे पंचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, या चारही खेळाडूंच्या कामगिरीचे क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News