Home » Uncategorized » महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलचे निर्विवाद वर्चस्व!

महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलचे निर्विवाद वर्चस्व!

Facebook
X
WhatsApp

लहू चव्हाण, पाचगणी

महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलचे निर्विवाद वर्चस्व!
U-14, U-17 आणि U-19 अशा तिन्ही वयोगटांत विजेतेपदाची हॅट्ट्रिक; खेळाडूंच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाकडून अभिनंदन…

 

पाचगणी (प्रतिनिधी) : महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत तिन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील (U-14), १७ वर्षांखालील (U-17) आणि १९ वर्षांखालील (U-19) अशा तिन्ही गटांत वर्चस्व गाजवत शाळेने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. या दैदीप्यमान यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, अचूक नियोजन, शिस्तबद्ध खेळ आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. तिन्ही वयोगटांतील खेळाडूंनी दाखवलेली चमकदार कामगिरी ही त्यांच्या कठोर परिश्रमाची, सातत्यपूर्ण सरावाची आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची फलश्रुती ठरली. या यशामुळे शाळेने व्हॉलीबॉलमधील आपली विजेतेपदाची परंपरा कायम राखली.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय भालचंद्र घोडके आणि महंत संजय घोडके यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे तसेच क्रीडा विभागाचे अभिनंदन केले. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यात जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी क्रीडा विभागप्रमुख मो. ताजिम खान, प्राचार्य तुषार महादेव खाडे आणि उपप्राचार्य मंगेश डोईफोडे यांनीही खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. खेळाडूंची मेहनत, जिद्द, सांघिक भावना आणि मैदानावरील शिस्त यामुळेच हे यश संपादन करता आल्याचे त्यांनी नमूद केले.
खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातील विकासालाही शाळा व्यवस्थापनाकडून प्राधान्य दिले जात आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देत त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांसाठी तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे. या यशामुळे शाळेतील क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळणार असून आगामी स्पर्धांमध्येही विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पंचगणी इंटरनॅशनल स्कूलच्या या तिहेरी यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News