Home » Uncategorized » महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नचिकेतास हायस्कूल उपविजेता

महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नचिकेतास हायस्कूल उपविजेता

Facebook
X
WhatsApp

लहू चव्हाण, पाचगणी.

महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नचिकेतास हायस्कूल उपविजेता!
५३ संघांचा उत्स्फूर्त सहभाग; अटीतटीच्या सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरी

पाचगणी, दि. १ : महाबळेश्वर तालुका क्रीडा कार्यालय आणि अमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाबळेश्वर तालुका लेव्हल व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६-२७’ पाचगणी येथील प्रसिद्ध अ‍ॅस्टॉन हॉस्टेलच्या क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुक्यातील तब्बल ५३ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले.
स्पर्धेतील विविध सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, अचूक समन्वय, जिद्द आणि सांघिक भावना यांचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळाले.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात पाचगणी येथील नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या संघाने दमदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात नचिकेतासच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज देत शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या उत्कृष्ट सांघिक खेळाचे उपस्थित मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि पालकांनी कौतुक केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अ‍ॅस्टॉन हॉस्टेलच्या क्रीडा विभागाचे तसेच आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या संघांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नचिकेतास हायस्कूलच्या संघाने मिळविलेल्या या उपविजेतेपदामुळे पाचगणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News