Home » देश » ठरलं! विधानसभेला साखर पेरणी पण कारखान्याच्या निवडणुकीत दुश्मनीचा ‘कोयता’, बारामतीत पुन्हा पवार vs पवार |

ठरलं! विधानसभेला साखर पेरणी पण कारखान्याच्या निवडणुकीत दुश्मनीचा ‘कोयता’, बारामतीत पुन्हा पवार vs पवार |

Facebook
X
WhatsApp

 

Last Updated:

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सोमेश्वर कारखान्यासाठी एकत्रित पॅनल उभे करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती

Someshwar Karkhanविशेष म्हणजे, निवडणुकीसाठी विविध राजकीय गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी अद्याप कोणत्याही प्रमुख गटाने अधिकृत पॅनल जाहीर केलेले नाही. त्यामुळे अंतिम क्षणी कोणत्या गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सोमेश्वर कारखान्यासाठी एकत्रित पॅनल उभे करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या चर्चेत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याचे समोर येत आहे.

विविध राजकीय गट आमनेसामने येण्याची शक्यता

 

1991 पासून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या प्रभावाखाली असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा विविध राजकीय गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्याची तयारी सुरू आहे. तर भाजपाकडून माजी आमदार संजय जगताप आणि अशोक टेकवडे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अर्ज माघारीचा उद्या अंतिम दिवस 

उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत उद्या संपत असतानाही अद्याप पॅनलची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणता गट सर्वप्रथम आपले पॅनल जाहीर करतो, याची प्रतीक्षा इतर गटांकडून केली जात असल्याचे चित्र आहे. त्यानुसार प्रतिस्पर्धी गटांकडून तोडीस तोड उमेदवार देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत शेवटच्या टप्प्यापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज शिल्लक राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. 514 पैकी 511 उमेदवारांचे अर्ज अद्याप कायम असून, उद्याच्या अंतिम दिवशी किती उमेदवार माघार घेतात आणि कोणते पॅनल अंतिम स्वरूपात मैदानात उतरतात, याकडे सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 हे ही वाचा :

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News