स्मार्ट मिटर विरोधात पँथर सेना, आर पी आय आक्रमक; निवेदनातून मिटर न काढल्यास टाळे ठोकण्याचा दिला इशारा…
पाचगणी : पाचगणी शहरात एम. एस. ई. बी. ने स्मार्ट मीटर विनापरवाना ग्राहकांच्या घरी जाऊन बसविले जात आहेत. ते त्वरित काढून त्याठिकाणी जुने मीटर मूळस्थितीत परत लावावेत अन्यथा आंदोलन करून कार्यालयास टाळे ठोकू असे इशारावजा आशयाचे निवेदन आज पँथर सेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने उपअभियंता एम एस ई बी यांस देण्यात आले आहे.
यावेळी पॅंथर सेना अध्यक्ष दीपक कांबळे, आर पी आयचे जॉन जोसेफ आतिश भोसले, नौशाद सय्यद, उपस्थित होते.
पांचगणी शहरामध्ये काही कॉलनी व शहर परिसरात विनापरवाना बंद असलेल्या घरांना स्मार्ट लाईट मिटर बसविले जात आहेत.
अशा ग्राहकांनी पँथर सेना व आर पी आय आठवले गट या संघटनाकडे सदर विषयाच्या विनंती वजा तक्रारी उपलब्ध झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत असे मिटर बदली केले आहेत ते मीटर काढून त्यांचे असणारे जुने मिटर त्वरीत बसविण्यात यावेत.
आपणामार्फत लवकरात लवकर बदली केले नाहीत तर आम्हांला आपणा व ठेकेदारांच्या विरोधात जन आंदोलन करुन आपल्या कार्यालयाला टाळे ठोकावे लागतील मग त्यापुढे होणाऱ्या परिणामांस आपले सर्व अधिकारी व ठेकेदार स्वतः जबाबदार राहतील. असं म्हटले आहे. या अर्जाची प्रत माहितीकरिता उपविभागीय कार्यालय वाई यांस दिला आहे.