Last Updated:
कोर्टातून बाहेर आल्यानंतर मुंबई, नवी मुंबईच्या आसपासच्या परिसरात राहता येणार आहे, अशी अट कोर्टाने घातली आहे.
मुंबई : अल्टा माउंटरोड बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याला मोठा दिलास मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला आहे. तब्बल साडे वर्षांनंतर तो तुरूंगाबाहेर येणार आहे. दरम्यान जामीन मंजूर करताना वाझेपुढे अनेक अटी शर्थी ठेवल्या आहेत. दरम्यान कोर्टातून बाहेर आल्यानंतर मुंबई, नवी मुंबईच्या आसपासच्या परिसरात राहता येणार आहे, अशी अट घालण्यात आली आहे.
अल्टा माउंट रोडवर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग, खून, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचणे आदी आरोप त्याच्यावर आहेत. त्याला याच प्रकरणात मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान साडेपाच वर्षानंतर त्याला जामीन मंजूर झाला त्यानंतर सचिन वाझेंना पासपोर्ट तात्काळ NIAकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. पासपोर्ट नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य साक्षीदारांची साक्ष पूर्ण होईपर्यंत मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये प्रवेशास मनाई केली आहे. बृहन्मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या हद्दीत राहण्यासही बंदी घालण्यात आली.
कोर्टाने काय अट घातली?
पाच जिल्ह्यांच्या बाहेर नवीन ठिकाणी वास्तव्य करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. तसेच आदेशापासून 7 दिवसांत नवीन निवासस्थानाचा पत्ता NIAला कळवणे बंधनकारक असून नेहमी चालू आणि चार्ज असलेला मोबाईल जवळ ठेवण्याची अट कोर्टाने घातली आहे. NIA किंवा स्थानिक पोलिसांच्या फोन, व्हॉट्सअॅप किंवा व्हिडिओ कॉलला तात्काळ प्रतिसाद देणे बंधनकारक आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत दर रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी बंधनकारक असून कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधण्यास मनाई केली आहे. साक्षीदारांवर प्रभाव टाकणे किंवा पुराव्यांशी छेडछाड न करण्याची न्यायालयाने अट घातली आहे.
वाझेंच्या वकिल काय म्हणाल्या?
दरम्यान जामीन मंजुर झाल्यानंतर वाझेंची बाजू मांडणाऱ्या वकिल आरती कालेकर म्हणाल्या, महत्वाची बाब म्हणजे सचिन वाझे हे सुपर कॉप आहे. अटी शर्ती नुसार जामीन दिला आहे. उद्या फॉर्मॅलिटी केल्यानंतर वाझे बाहेर येणार आहेत.
हे ही वाचा :
