Home » देश » नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, डोळ्यात पिळला लिंबू; महिलेचा छळ करत लाखो रुपयांचा चुना | महाराष्ट्र बातम्या

नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, डोळ्यात पिळला लिंबू; महिलेचा छळ करत लाखो रुपयांचा चुना | महाराष्ट्र बातम्या

Facebook
X
WhatsApp

 

Last Updated:

नाशिकच्या गोदाघाटावर पीडित महिलेला अघोरी स्नान घालून तिच्या डोळ्यांत लिंबाचा रस पिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18
News18

धुळे:  आजारपण आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली धुळ्यातील गरीब कुटुंबाची तब्बल एक लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या महिला मांत्रिकाला धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या गोदाघाटावर पीडित महिलेला अघोरी स्नान घालून तिच्या डोळ्यांत लिंबाचा रस पिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी धुळे पोलिसांनी नाशिकमधील मांत्रिक महिलेसह तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील एका गरीब कुटुंबातील महिलेला आजारपण आणि तिच्या घरातील कौटुंबिक संकट दूर करण्याचं आमिष दाखवत नाशिकच्या मांत्रिक महिलेने आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिला मांत्रिकाने पीडितेच्या 21 वर्षीय मुलीला दुर्धर आजार असल्याचं सांगत तिला तब्बल 40 दिवस कुटुंबापासून दूर ठेवण्यात आलं. इतकच नाही तर पीडित महिलेला नाशिकच्या गोदाघाटावर नेऊन अघोरी स्नान घालण्यात आलं. अंगावरून उतरवलेल्या लिंबाचा रस थेट तिच्या डोळ्यांत पिळण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे.

तांत्रिक विधींच्या नावाखाली कुटुंबाची एक लाख 60 हजार रुपयांची फसवणूक

 

या अघोरी प्रकारांसह विविध तांत्रिक विधींच्या नावाखाली कुटुंबाची एक लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. अनिसच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबाला पोलिसांत तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर पीडित महिन्याच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रं वेगाने फिरवत धुळे पोलिसांनी नाशिकमधून मांत्रिक महिला सरिता जाधव आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलं असून धुळे शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा :

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News